कोल्हापूर : व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, गोड खिचडी, नाचणीचे सत्त्व, मोड आलेले कडधान्य, मसुरी पुलाव आणि केळी किंवा स्थानिक फळ… ही नावे वाचून हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या ग्राहकांनी मागावलेल्या अन्नपदार्थांची यादी असेल असे वाटेल. पण राज्य शासनाने शालेय पोषण आहारासाठी शाळांना सुचवलेल्या पदार्थांची. केवळ खिचडी, वरण-भात, उसळ भात अशा मर्यादित खाद्यापदार्थांऐवजी यंदापासून १५ लज्जतदार पदार्थांची चव ८६ हजार ५०० शाळांमधील १ कोटी ३ लाख विद्यार्थ्यांना चाखता येणार असल्याने त्यांची ज्ञानाच्या जोडीनेच अन्नाची गोडी वाढणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या योजनेमध्ये स्थानिक अन्नधान्य, तृणधान्य व अन्य पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने याबाबतचे नवे धोरण नुकतेच जाहीर केले आहे.

हेही वाचा >>> विनोद तावडे आणखी मोठे होतील – चंद्रकांत पाटील

तीनस्तरीय आहार

तज्ज्ञ व्यक्तींच्या समितीने सादर केलेल्या शिफारशीनुसार या वर्षीपासून विद्यार्थ्यांना तीनस्तरीय आहार (थ्री कोर्स मिल) दिला जाणार आहे. तो दिल्यास विद्यार्थी शालेय पोषण आहार अधिक आवडीने खातील अशी अपेक्षा शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. त्यामध्ये तांदूळ, डाळी, कडधान्यापासून तयार केलेले आहार, मोड आलेले कडधान्य (स्प्राउट्स) आणि गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर, नाचणी सत्त्व याचा समावेश केला आहे.

लज्जतदार पदार्थ

चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाककृती सुधारणा समितीने १५ प्रकारच्या पाककृती देण्याचे निश्चित केले आहे. हे पदार्थ याप्रमाणे – व्हेजिटेबल पुलाव, मसाले भात, मटार पुलाव, मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव, अंडा पुलाव, मोड आलेल्या मटकींची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा वरण-भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्त्व आणि मोड आलेले कडधान्य. अंडीपुलाव, केळी किंवा स्थानिक फळ. प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे हे पदार्थ वेगवेगळ्या दिवशी विद्यार्थ्यांना पुरवले जाणार आहेत.

जे विद्यार्थी अंडी खात नाहीत त्यांना केळी अथवा स्थानिक फळ दिले जाणार आहे. बचत गटाचे आहार तयार करण्याचे दर निश्चित केले आहेत. राज्य शासनाच्या सुधारित आदेशानुसार अंमलबजावणी केली जाईल. – इरफान पटेल, शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी, इचलकरंजी महापालिका

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 delicious food in school mid day meal from this year zws
Show comments