कोल्हापूर : नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असताना महावितरण कंपनीने आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी वीज ग्राहकांवर आर्थिक भार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरण कंपनीने लघुदाब घरगुती, व्यापारी, शेतकरी लघुदाब, व्यापारी व उच्च दाब उद्योग या ग्राहकांवर सरासरी १५ ते ४० टक्के वीजदर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी सोमवारी दिली.

सर्वानाच फटका

या दरवाढीमुळे घरगुती, व्यावसायिक, शेतकरी अशा सर्वच श्रेणीतील नागरिकांना आर्थिक भार सोसावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 tariff hike electricity
छायाचित्र – लोकसत्ता टीम

हेही वाचा – शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा – सोलापुरात वंचितच्या उमेदवारीमुळे मतविभागणी टाळण्याचे काँग्रेसपुढे आव्हान

दरवाढ याप्रमाणे

ते म्हणाले, घरगुती लघुदाब वीजेचा दर १०० युनिटपर्यंत २४ टक्के तर ५०० युनिटच्या वर ३४ टक्के दरवाढ होणार आहे. व्यापारी वापरात १५ ते २० टक्के वाढ होणार आहे. शेती वीज वापर ग्राहकांना ३८ ते ४८ टक्के वाढ होणार आहे, असे होगाडे यांनी सांगितले.