कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनावेळी झालेल्या हिंसक घटना प्रकरणी २१ आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सोमवारी सांगितले. दरम्यान. गडावरील अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाली आहे.

विशाळगड अतिक्रमण हटवावे या मागणीसाठी काल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी हिंसक वळण लागून विशाळगडच्या पायथ्याला असलेले दुकाने, घरे, प्रार्थनास्थळ यांची तोडफोड करण्यात आली. नागरिक,  पोलीस अधिकारी यांच्यावर दगडफेक, धक्काबुक्की प्रकार घडले.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

हेही वाचा >>> केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडून कोल्हापूर जिल्हा बँकेची अशी ही ‘झाडा’झडती; उद्घाटनासाठी येण्याकरीता १० हजार झाडे लावण्याची सक्ती

या प्रकरणी २१ आरोपींना व्हिडिओ फुटेच्या आधारे अटक करण्यात आली असली तरी त्यांची नावे देण्यास रात्रीपर्यंत पोलिसांनी टाळाटाळ चालवली होती. उर्वरित आरोपींची व्हिडिओ फुटीच्या माध्यमातून ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, असेही सांगण्यात आले.बंदोबस्त साठी असणारी अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, अजित टिके, आप्पासाहेब पवार यांच्यासह काही पोलीस दगडफेकीत जखमी झाले आहेत.

दरम्यान विशाळगड येथील अतिक्रम हटवण्यास आज सुरुवात झाली. सुमारे ३५ अतिक्रमणे हटवण्यात असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यासह सुमारे ५०० कर्मचारी तैनात केले आहेत.

हेही वाचा >>> कोल्हापूर : विशाळगडच्या हिंसक कारनाम्यात पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावर

प्रशासनाचे अपयश

राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य खबरदारी गांभीर्याने घेतली नसल्याने विशाळगडची घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला आहे. संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिके नंतर हिंसाचार झाला त्याचा निषेध करतो.उद्या मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत, असेही ते म्हणाले.

संभाजीराजेंना अटक करावी विशाळगड  तणाव प्रकरणाला संभाजीराजे छत्रपती हे जबाबदार आहेत, असा आरोप  मुस्लिम समाजाने केला. त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम बोर्डिंग पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अध्यक्ष गणी आजरेकर, प्रशासक कदर मलबारी आदींनी निवेदन दिले.