कोल्हापूर: येथील दि न्यू एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर च्या १०३ वर्धापन दिनी  सौ. स. म. लोहिया हायस्कुल व ज्युनियर कॉलेजच्या २५० विध्यार्थ्यांनी शिवचरित्र साकारून एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये कोल्हापूरचे नाव नोंदवले आहे. २२८ देशात असलेल्या या वर्ल्ड रेकोर्ड बुक मध्ये नोंद होण्यासाठी कलाशिक्षक सागर बगाडे यांनी  छत्रपती शिवरायांचे विस्मरणात गेलेले मावळ्यांचे चरित्रावर आधारित बॅले नृत्य नाट्याची संकल्पना घेऊन १५ मिनिटांचा नृत्याविष्कार साकारला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> कोल्हापुरात महालक्ष्मीची किरणोत्सवाची तीव्रता वाढली

ऐतिहासिक वेशभूषा , भव्य सेट , अप्रतिम रचना व चित्तथरारक रणसंग्राम ही या बॅले ची वैशिष्ट्ये होती. पेटाळाच्या मैदानात या भव्य ऐतिहासिक बॅलेच्या बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड साठी निरीक्षक म्हणून डॉ. महेश कदम व त्यांचे पथक उपस्थित राहिले होते. त्यांनी विक्रमाची उद्घोषणा केली. या विक्रमा साठी संस्थेचे सल्लागार विनोदकुमार लोहिया , नियामक मंडळचे अध्यक्ष निर्मल लोहिया ,उपाध्यक्ष नितिन वाडीकर वनेमचंद संघवी, संस्था सचिव श्री प्रभाकर हेरवाडे आणि सह सचिव एस एस चव्हाण यांचे प्रोत्साहन लाभले. प्रमुख अतिथी सह जमलेल्या हजारो प्रेक्षकांनी या शिव सोहळा चे कौतुक केले . आकाश एकल याने छत्रपतींची भूमिका साकारली तर सरनोबत प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत संग्राम भालकर  यांनी दमदार परफॉर्मन्स केला . सार्थक भिलारी , रोहित सुतार , रोहित खोचारे, अथर्व मोरे ,द्वारका सपाटे यांचे सह २५० आजी माजी विद्यार्थ्यांनी आज या नृत्यनाट्य मधून शिवरायांचे जीवनातील प्रसंग साकारले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 250 students perform dance drama based on life of shivaji maharaj in kolhapur zws
Show comments