कोल्हापूर : अलमट्टीतून ३ लाख क्युसेक पाणी सायंकाळपासून सोडण्यात येणार असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सायंकाळी झालेल्या आढावा बैठकीवेळी सांगितले. जिल्ह्यात अजून दीड महिना पावसाळा असतो हा विचार करुन नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांच्यासमवेत जिल्हा प्रशासनाचा ऑनलाईन स्वरुपात पुरस्थितीच्या अनुषंगाने आढावा घेतला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विविध नद्यांच्या पाणीपातळी, धरणसाठा, स्थलांतरीत संख्या तसेच राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे उपस्थितांना माहिती दिली. बैठकीत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार राजेश पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार राजू आवळे, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे व संबंधित यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा