केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांची माहिती
नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यानंतर केवळ शेतकऱ्यांसाठी ३८ लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, असा दावा, केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी शुक्रवारी रात्री केला.
पंतप्रधान मोदी यांनी दोन वर्षांत केलेल्या विकासकामांचा आढावा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा यासाठी इचलकरंजीत शहापूर येथील चौकात विकासपर्व जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी गिरिराज सिंह बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे जिल्हाध्यक्ष िहदुराव शेळके होते.
गिरिराज सिंह म्हणाले,ह्वकेंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर काँग्रेस आघाडीच्या काळात झालेले भ्रष्टाचार बाहेर काढून त्यांनी मिळविलेले हजारो कोटी रुपये नागरिकांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध योजना राबवल्या. त्यामध्ये घरगुती गॅस अनुदान, सुरक्षा विमा योजना, पीक विमा योजना, निराधारांना अनुदान अशा जन कल्याणकारी योजनांचा समावेश आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या कामांवर कोणीही आक्षेप घेण्याचा प्रश्न उद्भवत नाही. प्रतिदिन दोन किलोमीटरऐवजी ३० किलोमीटर रस्ते बांधणीचे लक्ष्य आहे. रेल्वेमार्ग उभारणी २ किलोमीटरऐवजी १५ किलोमीटर करण्यात येणार आहे. या सरकारने केवळ विकासकामांना प्राधान्य दिले आहे.ह्व
काँग्रेसच्या काळात पंतप्रधानांना भेटण्यापूर्वी सोनियांच्या दरबारात जावे लागत होते असा टोला सिंह यांनी लगावला. सध्या मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना केली जात आहे. मात्र राहुल गांधी यांना बल आणि गाय यातील फरक माहिती नाही, अशी खिल्ली त्यांनी उडविली.
स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही महाराष्ट्र, कर्नाटकात पाणीटंचाईमुळे दिवसेंदिवस शेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्याला काँग्रेस आघाडी सरकार जबाबदार असून, महाराष्ट्रात रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २० हजार कोटीची तरतूद केली असल्याचे खासदार भूपेंद्र यादव यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा