कोल्हापूर : हालगी, कैताळ, तुंतारी या पारंपारिक वाद्यांच्या निनादात उदगांव (ता.शिरोळ) येथील श्री जोगेश्वरी देवीच्या यात्रेत शुक्रवारी अकराशे वर्षाची परंपरा असलेला मुकुट खेळ हजारो भाविकांनी अनुभवला. मुकुटाला खिजवून पळत असलेला सवंगडी त्यांच्या पाठीमागे लागणारा मुकुट हा थरारक खेळ हजारी भाविकांनी टिपला.
हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्याच दिवशी मृग बरसला
उदगांव येथे जोगेश्वरी यात्रा चार दिवस असते. आज श्री जोगेश्वरी मंदिरातून देवीची मुकूटे काढण्यात आली. एक नर, दोन मादीचे मुकुटे व सुपाचा मुकुटाच्या खेळाला सुरूवात झाली. डोक्यावर मुकुट घेवून हातात वेताची काठी व पाठीमागे धारणारी व्यक्ती असते. मुकुटाला खिजवून पळणार्या अनेक सवंगड्यांनी मुकुट धारकाच्या हातातील वेताच्या काठीचा मार झेलला. तरूण शालेय मुले, भाविकांनी मुकुट खेळून उत्साह वाढविला.मकुटाची काठी न घेता तरूणांनी नारळ उचलल्यानंतर जल्लोष करण्यात आला. मानपानानंतर जोगेश्वरी मंदिरात मुकुटांची स्थापना करण्यात आली. तर काल जोगेश्वरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. बलुतेदारांची पिसे काढण्याचा सोहळा उत्साहात झाला.