कोल्हापूर : ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत दर्जा सिद्ध केलेल्या चार एकांकिकांची मंगळवारी विभागीय अंतिम फेरीसाठी निवड झाली. आता हे संघ गुरुवारी (१३ डिसेंबर) येथील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे होणाऱ्या विभागीय फेरीत कलाविष्कार सादर करतील. आजही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांना सुरेख नाटय़रूप दिले. यामध्ये विषयांचे नावीन्य आणि त्याची हाताळणी उल्लेखनीय होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काळाच्या प्रवाहात जगण्याच्या पद्धती बदलतात. चालीरीतीही बदलतात आणि नातेसंबंधही वेगळे वळण घेतात. जीवनातले हे सारे पैलू कलेसाठीही आकर्षण ठरतात. त्याचा प्रत्यय ‘लोकसत्ता लोकांकिका’ राज्यस्तरीय आंतरमहाविद्यलयीन एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या दुसऱ्या दिवशी कलानगरीत नाटय़रूपाने आला.

महाविद्यालयीन तरुणाई मुळातच आव्हानांना भिडणारी, नवे काही करू पाहणारी. त्यामुळे समलिंगी संबंधावर आधारित प्रयोग ‘द  गिफ्ट ‘  मध्ये कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालयाने सादर केला. इच्छामरण हवे असणारी समलिंगी संबंधातील एक व्यक्ती आणि त्याचा संवंगडी यांच्या भावनात्मक नात्याची गुंफण नेटकेपणाने सादर करण्यात आली.

इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या संघाने सादर केलेल्या ‘कस्तुरा’ या एकांकिकेने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. सतीची परंपरा कालौघात पडद्याआड गेली आहे. पण हीच कल्पना मध्यवर्ती ठेवून मरणविधीसारखी गंभीर घटना उपहासात्मक, व्यंगचित्रात्मक पद्धतीने उलगडून दाखवण्यात कलाकार यशस्वी ठरले. नातेसंबंधावरच आधारित आणखी एक भावलेली कलाकृती म्हणजे ‘मर्सिया’. सांगली येथील श्रीमती नेमगोंडा पाटील महाविद्यालयाने हा विषय उत्तमपणे मांडला. आई आणि मुलगी, त्यांच्या आयुष्यातील पोकळपणा, आंतरिक उमाळा याचे पदर उलगडत गेलेली ही कलाकृती. याचेही सादरीकरण उपस्थितांची दाद घेऊन गेले.

या मानाच्या स्पर्धेत उतरलेल्या तरुणाईला आपल्या सादरीकरणाविषयी मान्यवरांकडून जाणून घ्यायचे होते. त्यामुळे सर्वच संघातील कलाकारांनी परीक्षक प्रदीप वैद्य आणि अभिनेते नितीन धांडकुले यांच्याशी संवाद साधला. त्यांनीही प्रयोग सादरीकरण प्रभावी होण्यासाठी कोणती दक्षता घेणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन केले.

विभागीय अंतिम फेरीसाठी निवडलेल्या एकांकिका

एक होता बांबूकाका (आर. आर. पाटील महाविद्यालय, तासगाव), द गिफ्ट (देशभक्त रत्नाप्पा कुंभार महाविद्यालय, कोल्हापूर), मर्सिया (श्रीमती नेमगोंडा पाटील महाविद्यालय, सांगली) आणि कस्तुरा (राजारामबापू इन्सिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर).

प्रायोजक

सॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित आणि पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेचे टॅलेन्ट हंड पार्टनर आयरिश प्रोडक्शन असून एरेना मल्टीमीडिया हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत. अस्तित्वच्या सहकार्याने रंगणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी झी मराठी हे टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.