कोल्हापूर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी न्यायालयाने सुनावली. यशवंत राजाराम मेणे (वय ४६,रा. अरवली, संगमेश्वर रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किसरूळ पैकी मुगडेवाडी गावामध्ये ही घटना ८ फेब्रुवारी २०१५ रोजी घडली होती. फिर्यादीच्या घराजवळ दूध डेअरी आहे. दूध नेण्यासाठी येणाऱ्या टेम्पोवर आरोपी मेने हा क्लीनर म्हणून काम करत होता. त्याचे आरोपीच्या घरी वरचेवर येणे जाणे होते. त्यादिवशी पीडित मुलगी गल्लीत खेळण्यासाठी गेली होती. ती रडत आली तेव्हा फिर्यादीने तिला जवळ घेऊन चौकशी केली. यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. ही घटना पीडितेने घरी सांगितली.

हेही वाचा… कोल्हापूर : लाच मागितल्या प्रकरणी महिला कॉन्स्टेबलला रंगेहाथ पकडले

कुटुंबीयांनी मेने याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणाची सुनावणी झाली. बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा कलम अंतर्गत आरोपीस वरील प्रमाणे आज जादा सह जिल्हा सत्र न्यायाधीश एम.बी. तिरके यांनी शिक्षा सुनावली. सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 years hard labor for the accused in the case of molesting a minor girl in kolhapur dvr
Show comments