कागल तालुक्यातील मौजे कापशी (सेनापती) येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या स्मारकाच्या बांधकामासाठी ५० लाख रुपये मंजूर झाले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने गुरुवारी देण्यात आली. सदरचा निधी ठेव बांधकामाच्या स्वरूपात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग न करता चालू वर्षी या कामावर खर्ची घालण्याची दक्षता जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी घ्यावी, असेही शासन आदेशामध्ये स्पष्टमध्ये म्हटले असल्याने स्मारकाच्या कामाला गती येण्याची चिन्हे आहेत.
सरसेनापती संताजी घोरपडे यांचे स्मारक कागल तालुक्यातील मौजे कापशी (सेनापती) येथे उभारण्यासाठी शासनाने १ कोटी ६७ लाख २७ हजार इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास व आराखडय़ास यापूर्वीच प्रशासकीय मान्यता दिली असून त्या अनुषंगाने मार्च २०१३, जानेवारी २०१४ व जून २०१४ मध्ये अनुक्रमे १७ लाख , ४५ लाख व ५० लाख असा एकूण १ कोटी १२ लाख इतका निधी उपलब्ध करून दिला आहे.
सदर स्मारकाच्या पुढील बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार  शासनाने 50 लाख रुपये  निधी मंजूर केला असून हा निधी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे वितरित करण्यात येत असल्याबाबतचा शासन निर्णय १४ ऑक्टोबर रोजी झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा