दयानंद लिपारे, लोकसत्ता
कोल्हापूर : वस्त्रोद्योगातील अन्य घटकांमध्ये मंदी, अडचणी याविषयीची चर्चा होत असली तरी त्यातील अखेरचा भाग असलेल्या गारमेंट (तयार कपडे) क्षेत्राला चांगले दिवस आल्याचे दिसत आहे. इचलकरंजी गारमेंट क्लस्टर या प्रकल्पातून दरमहा सुमारे दीड लाख तर या माध्यमातून सुरू झालेले अन्य छोटे घटक आणि अन्य उद्योजक यांच्या माध्यमातून दरमहा ५ लाख नग कपडय़ांची निर्मिती होत आहे. या माध्यमातून मूल्यवर्धिततेचा लाभ होत असतानाच सुमारे पाच हजार महिलांना रोजगाराची संधी मिळालेली आहे.
सुती कापडासाठी इचलकरंजीचे नाव राज्यात ओळखले जाते. सुतापासून कापडनिर्मिती ११८ वर्षांची परंपरा आहे. साधे माग ते अत्याधुनिक शटललेस माग अशी चढती कमान यंत्रमाग व्यवसायाने राखली आहे. वस्त्रोद्योगात कापूस, सुत, कापड प्रक्रिया (प्रोसेस) व गारमेंट (तयार कपडे) अशी साखळी वर चढत राहील; त्याप्रमाणे मूल्यवर्धिततेचा अधिक लाभ होत असतो.
सध्या वस्त्र उद्योगातील अन्य घटकांमध्ये व्यावसायिक अडचणी कथन केल्या जात आहेत. तुलनेने गारमेंट क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. गारमेंटमध्ये पुरुषांच्या तुलनेने महिलांना कामाची संधी अधिक असते.
करोनाकाळात मोठय़ा प्रमाणात मुखपट्टी पीपीई किटचे उपदान घेऊन महामारीत जनतेला उपयुक्त वस्तूंचे उत्पादन केले होते.
केंद्र शासनाच्या माध्यमातून इचलरकंजी गारमेंट क्लस्टरची सुरुवात सहा वर्षांपूर्वी माजी वस्त्रोद्योगमंत्री, आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. सध्या मुख्य युनिटमध्ये सुमारे ४०० महिला काम करतात. तर अप्रत्यक्षरीत्या ६०० महिला काम करतात. क्लस्टरचे दैनंदिन कामकाज माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, वैशाली आवाडे पाहतात.
निर्यात बाजारात ठसा
जुना चंदूर रस्त्यावर १०० मशीन असलेले याचे दुसरे युनिट सुरू झाले आहे. येथे अकुशल महिलांना प्रशिक्षण देऊन कामाची संधी दिली जात आहे. कितीही महिला कामासाठी आल्या तरी त्यांना सामावून घेऊ शकतो इतकी कामाची व्याप्ती वाढली आहे. गारमेंटचे तितक्या प्रमाणात वाढले आहे. याशिवाय अन्य छोटय़ा ५० युनिटना घरबसल्या काम मिळवून दिले आहे. या माध्यमातून सुमारे दीड हजार महिलांना रोजगाराची संधी मिळालेली आहे. येथे डेनिम, पॅन्ट वगळता सर्व प्रकारचे तयार कपडे बनवले जातात. ते प्रामुख्याने जगातील सर्वात मोठी विक्री साखळी असलेली वालमार्ट, मॅक्स, रिलायन्स, बिग बाजार, लाइफ टाइम, पेंटालुन आदी नामांकित कंपन्यांना विकले जाते. तर निम्मी उत्पादने युरोप, आखाती देशांमध्ये निर्यात केली जातात, या माध्यमातून गारमेंट क्लस्टरची दरमहा एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून याचा विस्तार केला जात आहे. सूक्ष्म, लघू व मध्यम क्षेत्रामध्ये शासनाने क्लस्टर (समूह विकास) सुरू करण्याची योजना आखली. त्यातील राज्यातील पहिल्या पाच क्लस्टरमध्ये इचलकरंजी गारमेंट क्लस्टरचा समावेश आहे, असे स्वप्निल आवाडे यांनी सांगितले.
५ लाख कपडय़ांचे उत्पादन
इचलकरंजी परिसरात काही छोटे-मोठे गारमेंट उद्योग सुरू आहेत. त्यांच्याकडील तसेच गारमेंट क्लस्टर माध्यमातून दरमहा सुमारे ५ लाख तयार कपडय़ांचे नग बनवले जातात. त्यातील निम्मी उत्पादन निर्यात केले जात असल्याने परकीय चलनाचा ओघ वाढत आहे. या माध्यमातून सुमारे ५ हजार महिलांना रोजगाराची संधी मिळाली असून त्या आर्थिकदृष्टय़ा स्वयंपूर्ण होत आहेत. उद्योजकांना वार्षिक काही कोटींची प्राप्ती होत आहे.