कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी एक अभिनव सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होत असतो. यावर्षी दादांच्या ६५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुणे, कोल्हापूर, अमरावती, सोलापूर, मुंबई यासह राज्यातील अनेक ठिकाणी ६५ हजार वृक्ष लागवडीचा व संगोपनाचा संकल्प करण्यात आला आहे. वरील विषयाला अनुसरून आज मंगळवार, ११ जून रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील या वृक्ष संवर्धनाचा पहिला टप्पा म्हणून पाटील व विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेंडा पार्क येथील ग्राउंड वर वृक्षारोपण करण्यात आले.

मागील दोन दिवसांत याठिकाणी जवळपास १२५ झाडे लावण्यात आली आहेत. आज दादांच्या हस्ते करंज या वृक्षाचे रोपटे लावण्यात आले. वाढत्या तापमानामुळे वृक्ष लागवडीचे महत्व अधोरेखित झाले असून वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संवर्धनाची भूमिका महत्वाची असून यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे, वृक्ष सवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्या उपक्रमांना सहकार्य करणार असल्याचे याप्रसंगी पाटील सांगितले.

आणखी वाचा-स्मार्ट प्रीपेड मीटर लागू केल्यास आंदोलन, ‘आप’चा कोल्हापुरात ‘महावितरण’ला इशारा

या वृक्षारोपणासाठी वृक्षप्रेमी वेलफेअर, नेस्ती फौंडेशनचे अमोल बुदडे, महादेव मोर, मनीषा शिरोळीकर, अक्षय कांबळे, अमर संकपाळ यांच्यासह अनेक सहकारी, वृक्षप्रेमी नागरिकांचे सहकारी लाभले. त्याचबरोबर गुरुवर्य सुहास वायंगणकर, डॉ विदुला स्वामी यांचे मार्गदर्शन लाभले.

याप्रसंगी महेश जाधव, विजय जाधव, राहूल चिकोडे, नाना कदम, राजसिंह शेळके, रुपाराणी निकम, आशीष ढवळे, अशोक देसाई, संदीप देसाई, माणिक पाटील-चुयेकर्, राजू जाधव, संग्राम निकम, संपतराव पवार, हंबीरराव पाटील, अप्पा लाड, राजू मोरे, गणेश देसाई, विशाल शिराळकर, अतुल चव्हाण, विवेक कुलकर्णी, अमर साठे, मंगला निपानीकर, अभिजीत शिंदे, सुधीर देसाई, हर्षद कुंभोजकर, गिरीश साळोखे, पारस पलीचा, अनिल कामत, संतोष माळी, सयाजी आळवेकर, अशोक लोहार, सतीश आंबर्डेकर, सुरज सनदे, नरेंद्र पाटील, दिलीप बोंदरे, हेमंत पाटील, संजय सावंत, संग्राम जरग, सुदर्शन सावंत, प्रताप देसाई, बंकट सूर्यवंशी, दत्ता लोखंडे, प्रसाद पाटोळे, प्रतिम यादव, हर्षाक हरळीकर, योगेश चिकोडे, योगेश साळोखे, शाहरुख गडवाले यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Story img Loader