कोल्हापूर : महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषि, सेवा उद्योग क्षेत्रांची शिखर संस्था म्हणून शंभर वर्षापासून कार्यरत असलेल्या ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ च्या संचालक मंडळाच्या द्वैवार्षिक निवडणूकीत कोल्हापूर जिल्ह्यातुन सात जणांची बिनविरोध निवड झाली आहे. ही माहिती संस्थापक शेठ वालचंद हिराचंद प्रगती पॅनेलचे प्रमुख, चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उदगावमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत मुकुट खेळ रंगला

गांधींचा प्रभाव निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे व सहाय्यक निवडणूक अधिकारी जे.के.पाटील यांच्या सहीने प्रसिध्द केलेल्या यादीनुसार पश्‍चिम महाराष्ट्रातील उपाध्यक्ष पदावर रमाकांत मालू यांची व संचालक मंडळ सदस्यपदी भरत जाधव, राजाराम पाटील, धैर्यशील पाटील, अश्‍विनी दानीगोंड, जितेंद्र शहा, नितीन धुत, नंदकुमार शहा यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे. ८९ जागांपैकी गांधी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे ७५ उमेदवार व तीन उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आल्याने त्यांचा प्रभाव दिसून आला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 members elected unopposed from kolhapur in the board of directors of maharashtra chamber of commerce zws