कोल्हापूर : महाराष्ट्र – कर्नाटक राज्यात घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्यास मंगळवारी येथील स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पकडले. सुमित महादेव निकम ( गजबरवाडी, ता. निपाणी) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून आठ ठिकाणी घरफोडी केल्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

शहरातील वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पथक सतर्क करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला कर्नाटकातील अभिलेखावरील गुन्हेगार सुमित महादेव निकम हा चोरीच्या सोन्याचे दागिने घेऊन मार्केट यार्ड येथे येणार असल्याची माहिती मिळाली होती. या ठिकाणी तो आला असता पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून १०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने ताब्यात घेतले. हे दागिने मुरगुड, राधानगरी, शहापूर या पोलीस ठाण्यातील प्रत्येकी दोन तर आजरा व कुरुंदवाड येथील एका चोरीचे असल्याची कबुली त्याने दिली.

हेही वाचा – सांगली : पूर नियंत्रणासाठी जागतिक बॅंकेकडून ४ हजार कोटी मिळणार

हेही वाचा – “मनसेला महायुतीत घ्या”, राहुल शेवाळेंची मागणी; म्हणाले, “समान विचार असणारे…”

त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात जबरी चोरी, घरफोडीचे वीस गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर, शेष मोरे, तुकाराम राजगिरे, सुरेश पाटील, सागर माने यांच्या पथकाने केली.

Story img Loader