कोल्हापूर : कोल्हापूर शहरात करोना संसर्ग रुग्ण आढळला  आहे. हा रुग्ण मुंबईहून आला आहे. तो विश्रामगृह परिसरातील आहे. रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेची आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर शहरात करोनाचा रुग्ण सापडल्याने विशेष दक्षता घेतली जात आहे. ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा/लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का याची तपासणी केली जात आहे.

हेही वाचा >>>कोल्हापूर : काळम्मावाडी नळ पाणी योजनेला पुन्हा गळती; शेतीचे नुकसान

 दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी बाहेर पडताना मास्क वापरण्याचे महापालिकेचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाण टाळावं तसेच पन्नास वर्षावरील नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्गमध्येही करोना रुग्ण आढळून आला होता.

Story img Loader