कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील किणी या गावात दुर्मीळ अशा उदमांजराला पकडण्यात आले. त्यास वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.  किणी मध्ये उदमांजर अन्न पाण्याच्या शोधात दिलीप बिरजे यांच्या घरी आले. कुटुंबियांनी रानमांजर असे समजून हाकलण्याचा प्रयत्न केला. ते घरातील अडगळीत शिरले. कुटुंबीयांनी ही घटना किणीतील वर्ल्ड फॉर नेचरचे प्राणिमित्र अनिल हुंदळेवाडकर व सर्पमित्र जोतिबा जोशीलकर यांना कळवली. त्यांनी रात्री उशिरा त्याला पकडले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटणे वनविभागाचे वन क्षेत्र पाल प्रशांत आवळे, वनरक्षक दीपक कदम, होगाडे यांनी त्यास मूळ नैसर्गिक अधिवासात सोडले. पूर्णतः काळ्या रंगाचे उदमांजर हा प्राणी प्रामुख्याने रात्री वावरतो. स्थानिक भाषेत फटकूरा म्हणतात. लहान प्राणी, पक्षी, कीटक हे त्याचे खाद्य आहे. उन्हाळ्यात जंगलाला आग लागत असल्याने ते मनुष्य वस्तीत आले असण्याची शक्यता आहे. अनेकदा करड्या रंगाचे उदमांजर आढळते. हे पूर्णतः काळ्या रंगाचे असून ते दुर्मिळ मानले जाते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A rare animal caught in kolhapur chandgarh taluka of forest department ysh