लोकसत्ता प्रतिनिधी
कोल्हापूर: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी येथे आम आदमी पक्षाने केली आहे. कारवाई न केल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा आप महिला आघाडीने दिला आहे.
किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये ते आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहेत. सोम्मया विरोधात अनेक तक्रारी येत होत्या, परंतु केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे गुन्हे नोंदविले जात नव्हते. आता सोमय्या यांच्यावर पोलिसांनी सोमोटो कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आप महिला शहराध्यक्षा अमरजा पाटील यांनी केली आहे.
आणखी वाचा-गमछा, हिजाब वरून कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात वाद
कागलमध्ये सामसूम
कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर ईडीकडून छापासत्र सुरु झाले. तेव्हा कागलमध्ये सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, प्रतिकात्मक पुतळा दहन असे प्रकार घडले होते. आता सोमय्या हेच आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणात गुंतले असल्याचे आरोप होत असताना कागल मध्ये मात्र कमालीची शांतता होती. बदललेल्या राजकारणाचा हा परिपाक असल्याची चर्चा आहे.