कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका आयुक्तपद गेली दोन महिने रिक्त असल्याने आता नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आली आहे. शनिवारी आप संघटनेने अभिनव आंदोलन करीत करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीला गाऱ्हाणे घालण्यात आले.

कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पद गेले दोन महिन्यांपासून रिक्त आहे. प्रभारी प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत आहेत. परंतु कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास अडचणी येत आहेत. परिणामी नवीन आयुक्ताची नेमणूक होईपर्यंत शहरवासियांना वाट बघावी लागणार आहे. नवीन आयुक्त आपल्या मर्जीतला असावा यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. परिणामी निर्णय प्रलंबित पडत आहे. महापालिकेला कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. नागरी सुविधाचा बोजवारा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने श्री महालक्ष्मी देवीसमोर गाऱ्हाणे मांडून आंदोलन केले.

हेही वाचा – पाणी तापले; इचलकरंजीच्या राज्यकर्त्यांनी भांडण लावू नये, दूधगंगेतून पाणी मिळणार नाही – आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

हेही वाचा – अल्पवयीन मुलीवर बलात्कार; इचलकरंजीत तरुणास अटक

‘कोल्हापूरला आयुक्त दे, या दसऱ्याला तोरण चढवू, पेढं तुझ्या समोर ठेवू, ग आई!’ असे गाऱ्हाने आम आदमी रिक्षा संघटनेचे सचिव बाबुराव बाजारी यांनी मांडले. प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, मोईन मोकाशी, दुष्यन्त माने, विजय हेगडे, उषा वडर, स्नेहा पतके आदी उपस्थित होते.

Story img Loader