नात्यातील बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका आरोपीस सहा वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी न्यायालयाने सुनावली. एका व्यक्तीने आपल्याच आठ वर्षाच्या भाचीला घरासमोर खेळत असताना पळवून नेले होते. ते दोघे जत, सांगली येथे नातेवाईकांकडे असल्याची माहिती मिळाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी पीडित मुलगी व आरोपीस ताब्यात घेतले. पोलीस तपासामध्ये आरोपीने जत येथे रात्रीच्या वेळी फळ मार्केटमध्ये नेवून लैंगिक प्रचार केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्याच्या विरोधात लहान मुलांचे लैंगिक संरक्षण कायदा प्रकरणी गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाची सुनावणी होऊन जादा सह जिल्हा व सत्र न्या. एम. बी. तिडके यांनी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील अनिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Accused sentenced to 6 years hard labor under pocso act amy