लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शहरातील एका अवैध एलपीजी सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर कारवाई करण्यात आली. येथून १५ घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर असे अंदाजे ६० हजार रुपयांचे साहित्य जप्त केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी शुक्रवारी दिली.

जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या पथकाने ग्राहक कल्याण दक्षता फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींसमवेत गुलाब गल्लीत कपिल मिठारी यांच्या घरी अचानक धाड टाकून तपासणी केली.

आणखी वाचा-इचलकरंजीत अस्वच्छतेचे साम्राज्य; आंदोलकांकडून अधिकारी धारेवर

यावेळी मिठारी यांच्या घराच्या आवारात दोन एलपीजी सिलेंडर, गॅस रिफ़िलींग नोझल, वजन काटा इत्यादी संशयास्पद साहित्य आढळले. तर आतील खोलीत सुमारे १५ घरगुती वापराचे एलपीजी सिलेंडर, वजन काटा तसेच मोटर आढळली. पथकाने सर्व साहित्य जप्त केले असून जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.