कोल्हापूर : शेत जमिनीवर नाव नोंदणी करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी तलाठी व खाजगी व्यक्तीवर गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. प्रदीप अनंत कांबळे, वय २२ तलाठी जैन्याळ व गणपती रघुनाथ शेळके वय ४६, खाजगी व्यक्ती यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – नैऋत्य मौसमी पावसाचे कोल्हापुरात आगमन
हेही वाचा – कोल्हापुरात नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
यातील तक्रारदार यांनी शेत जमिनीवर कर्ज घेतले होते. त्याचा बोजा कमी करण्यासाठी तलाठी कांबळे यांना भेटले असता त्यांनी प्रकरण पाहून सांगतो असे उत्तर दिले. तक्रारदार कार्यालयातून बाहेर येत असताना शेळके यांनी तलाठी कांबळे यांना पाच हजार रुपये लाच दिले नाही तर काम करणार नाही असे सांगितले. तक्रारदारांच्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपरोक्त दोघांवर कारवाई केली असून मुरगूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.