लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : खतउत्पादक कंपन्यांनी अनुदानित खतासोबत अन्य खत घेण्याची सक्ती केल्यास (लिंकिंग) अशा निविष्ठा विक्री केंद्रांची कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून कठोर कारवाई करावी, अशा सूचना आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

कृषी विभागाचे अधिकारी, खतउत्पादक कंपन्या आणि निविष्ठा विक्रेत्यांसोबत येथे आढावा बैठक झाली. या वेळी ते बोलत होते. बैठकीला ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, स्मार्ट प्रकल्पाच्या नोडल अधिकारी प्रणाली चव्हाण, करवीरचे उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील उपस्थित होते.

आणखी वाचा-तब्बल पाच महिन्यांनंतर विशाळगड पर्यटकांसाठी खुला

खताची पुरेशी उपलब्धता

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी, चालू हंगामासाठी उपलब्ध खतांची माहिती देऊन कोणत्याही खतांचा तुटवडा नाही. यापुढेही सर्व खतांचा गुणवत्तापूर्ण व मुबलक पुरवठा होईल याचे नियोजन केल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत रब्बी हंगामामध्ये खतांची उपलब्धता, वाटपाबाबत नियोजन करण्यात आले असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी सारिका रेपे यांनी दिली.

Story img Loader