कोल्हापूर : मराठा समाजाच्या आंदोलनावरून कोल्हापुरात वातावरण तापले असताना हा प्रश्न तूर्तास मिटवण्यात पालकमंत्री दीपक केसरकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना आज यश आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूरचा दौरा अनेक कारणाने महत्त्वाचा होणार आहे. स्वातंत्र्यदिनी सकल मराठा समाजा समाजासोबत झालेली बैठक वादग्रस्त ठरली होती. आता पवार यांच्या दौऱ्याचे निमित्त करून वातावरण तापवले गेले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी थेट त्यांच्या मोटारी खाली घुसण्याचा इशारा दिला होता. मात्र आता शिवसैनिकांना तलवार म्यान करावी लागली आहे. याला कारण ठरले ती आज पालकमंत्री दीपक केसरकर व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ या मंत्रीद्वयीसह पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासोबत सकल मराठा समाजाची झालेली बैठक. यावेळी मंत्र्यांनी १९ सप्टेंबर म्हणजे गणेश चतुर्थी पूर्वी मुंबई येथे मंत्रालयात सकल मराठा समाज आरक्षणाबाबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उद्या १० सप्टेंबर रोजी पुकारलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

हेही वाचा… “एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून मराठ्यांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू”

हेही वाचा… भाजपच्या ४० टक्क्यांहून अधिक जागा धोक्यात? सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे चिंता वाढली

याबाबत राज्य सरकारकडून दिलेला शब्द पाळला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.सकल मराठा समाजाच्या बैठकीस वसंतराव मुळीक, आर.के. पोवार , बाबा पार्टे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बाबा इंदुलकर, दिलीप देसाई, अनिल घाडगे, धनंजय सावंत, शाहीर दिलीप सावंत, सुशील भांदिगिरे, मयूर पाटील, काका पाटील, काका जाधव, अमर निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agitation on maratha reservation in kolhapur suspended obstacle cleared for ajit pawar public rally on sunday asj