कोल्हापूर: कृषी निविष्ठा दुकान सुरू करण्यासाठी लाच मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्याला मंगळवारी कोल्हापुरात रंगेहात पकडण्यात आले. सुनील जगन्नाथ जाधव, (वय ५०, पद – सद्या रा. इंद्रजित कॉलनी,कोल्हापूर, मुळ रा.शाहूपुरी सातारा) या अधिकाऱ्याचे नाव आहे.तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात. शेतकऱ्यांना लागणारे खत,बी बियाणे आणि कीटकनाशके यांची विक्री करण्याकरिता तक्रारदार यांना  स्व:ताचे दुकान चालू करावयाचे होते.

त्याकरीता आवश्यक असलेला परवाना मिळण्याकरिता तक्रारदार यांनी कृषी कार्यालयाकडे ऑनलाईन  अर्ज केला होता. अर्ज मंजूर करून पुढील कार्यवाही करून वरिष्ठांच्याकडे पाठविणेसाठी सुनील जगन्नाथ जाधव यांनी तक्रारदार यांचेकडे प्रथम १० हजाररुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ९हजार रुपयांची लाच मागणी करून केली. ही लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. सुनील जगन्नाथ जाधव यांच्या यांचेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई सुरू आहे,असे पर्यवेक्षण अधिकारी, सरदार नाळे,पोलीस उप अधीक्षक यांनी सांगितले.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Illegal building on road in Nandivali Samarth Chowk demolished
मानपाडा-बाह्यवळण रस्ता ते कोपर रस्त्यामधील अडथळा दूर
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
Target of purchasing 33 lakh quintals of paddy in tribal areas
आदिवासी क्षेत्रात ३३ लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
Story img Loader