बी-बियाणे, खते वाजवी दरात उपलब्ध करून देण्याची मागणी
पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे निर्माण झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खरीपपूर्व शेतीकामांना वेग आला आहे. रखरखत्या उन्हातही शेतकऱ्यांनी शेती मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. खरीप हंगामासाठी कृषी कर्जाचे वितरण लवकरात लवकर करण्यात यावे. बी-बियाणे व रासायनिक खते वाजवी दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.
गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकरी अडचणीत आला. खरिपात तरी निसर्ग साथ देईल आणि शेतीतून काहीतरी हाती येईल या आशेने शेती मशागत करण्याच्या कामाला लागला आहे. बलजोडीद्वारे अनेक शेतकरी आपल्या शेताची मशागत करतात. मात्र ज्यांच्याकडे बल नाहीत त्यांना बलजोडीचा शोध घ्यावा लागतो. शिवाय बलजोडीने मशागत करताना वेळ वाया जातो. समाधानकारक मशागत होत नाही. यापेक्षा ट्रॅक्टर सहज उपलब्ध होते. शिवाय वेळेची बचत होते आणि शेताची नांगरणी खोलवर होते. यामुळे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरद्वारे मशागतीकडे कल वाढला आहे. परंपरागत बलजोडीच्या साहाय्याने मशागत न करताना आधुनिक पद्धतीने म्हणजेच ट्रॅक्टरद्वारे मशागत करताना तो दिसून येत आहे. जमिनीची पोत सुधारण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांपेक्षा शेणखत शेतात टाकत आहेत. कूपनलिका व धरणांनी तळ गाठला असून, मे महिन्यात लागवड करण्यात येणार्या कपाशीचे प्रमाण कमी राहणार आहे.
गेल्या दोन वर्षांपासून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळिराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला. मात्र तरी देखील यंदा नवीन जोमाने व आशेने तो कामाला लागला आहे. पशांची जमवाजमव करून बी-बियाणे खरेदीकरून मशागतीच्या कामाला तो लागला आहे. दुष्काळामुळे भूजलपातळीत कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामाच्या पेरणीकरिता बियाणे खरेदीसाठी पशांची जुळवाजुळव करताना शेतकरी दिसत आहेत. बी-बियाणे, खते खरेदीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. प्रामुख्याने पीक कर्ज घेण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटय़ांमध्ये गर्दी दिसून येत आहे.
जिल्ह्यात खरीप हंगाममध्ये शेतकऱ्यांना कृषिनिविष्ठा बियाणे, खते, कीटकनाशके योग्य दर्जा, योग्य किमतीत व वेळेत मिळावीत यासाठी जिल्ह्यात भरारी पथके स्थापन केली आहेत. यातील एक पथक जिल्हास्तरीय आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी बसवराज मास्तोली यांनी दिली. खते, बी-बियाणांचा होणारा काळा बाजार थांबविण्यासाठी कृषी विभागाने नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना योग्य दर्जाची तसेच योग्य किमतीत आणि योग्य वेळी निविष्ठांशी उपलब्धता व्हावी यासाठी भरारी पथके काम करतील.
निविष्ठा उपलब्धतेच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या तक्रारी, अडचणी असल्यास खरीप हंगाम भरारी पथकास शेतकऱ्यांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा