लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता बहुराज्य बँकेचा मिश्र व्यवसाय ४२५० कोटीचा आहे. तो मार्च २०२५ अखेर ५ हजार कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी गुरुवारी सांगितले.

Job appointment letter and death of father prospective teacher experienced two extreme opposite situation
नोकरीचे नियुक्ती पत्र अन् पित्याचे निधन; भावी शिक्षकाने अनुभवले घटकेत दोन टोकाचे प्रसंग
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
wrestler Suraj Nikam Suicide
‘कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं, कुस्ती विश्वावर शोककळा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Cabinet Formula
नव्या सरकारच्या मंत्रिमंडाळाचा फॉर्म्युला ठरला? महाराष्ट्रातील किती खासदारांची कॅबिनेटमध्ये वर्णी?

या बँकेची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. यावेळी अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले, बँकेच्या आजवरच्या कारकिर्दीत विक्रमी असा ५४ कोटी रुपयांचा नफा मिळवलेला आहे. विविध समाजाच्या महामंडळाच्या योजनांचा सर्वाधिक लाभ याच बँकेने दिला आहे. आगामी काळामध्ये नेट बँकिंग सुरू करण्याचा नियोजन केले आहे.

आणखी वाचा-‘बिद्री’ कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प बंद पाडण्याचे पाप माथी घेऊ नका; माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांचे भावनिक आवाहन

स्वयंप्रकाश सौर प्रकल्प

बँकेच्या वतीने घरगुती वीज वापरासाठी स्वयंप्रकाश सौर प्रकल्प योजना राबवण्याची घोषणा त्यांनी केली. ते म्हणाले, याकरिता ग्राहकांनी ५ टक्के व्याज भरायचे आहे. ७५ हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे. मासिक विजेच्या बिलाइतकीच रक्कम हप्त्यापोटी भरली तरी ७ वर्षांमध्ये कर्ज फिटते.

या बँकेच्या प्रयत्नामुळे सर्व प्रकारचे आधुनिक बँक माग इचलकरंजी मध्ये येऊ शकले, असा उल्लेख करून बँकेचे मार्गदर्शक आमदार प्रकाश आवाडे यांनी बँकेने व्यावसायिक धोरण असताना ग्राहकाभिमुख कर्ज प्रकरणे हाताळण्याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. बँकेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासह माजी अध्यक्ष, संचालक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय शिरगावे यांनी नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष संजय कुमार अनिगोळ यांनी आभार मानले.