राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याच्या भाषणाबरोबरच सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. कोल्हापूरमध्ये शुक्रवारी पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना अजित पवार यांनी शिंदेंच्या बीकेसीमधील दसरा मेळाव्यातील भाषणापासून ते निधी वाटपामधील भेदभावासारख्या विषयावर भाष्य केलं. इतकचं नाही तर कोणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही असं सांगताना शिंदेंनाही घरी जावं लागेल असं विधान अजित पवारांनी केलं.

नक्की वाचा >> Dasara Melava: ‘फिरायला नेतो’ सांगून परराज्यातील कामगारांना पुण्यातून CM शिंदेंच्या मेळाव्याला आणलं; म्हणे, “राज ठाकरेंच्या…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अजित पवार सत्ता गेली म्हणून ओरडतोय असं वाटेल. पण तसं नाहीय. सत्ता येते, सत्ता जाते. आम्ही सत्तेसाठी हापहापलेले नाही आहोत. जी जबाबदारी जनता देईल ती आम्ही पार पाडू. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर तिथं भाषण करत असताना सारखं ‘ही लोक बसलेली आहेत ती आपणहून आली आहेत,’ असं ते (मुख्यमंत्री) म्हणत होते. अरे निम्मी तर तुमच्या भाषणात निघून गेली. मग कशी आपणहून आली? खुर्चा मोकळ्या झाल्या. आपणहून आलेल्या लोकांनी खुर्च्या मोकळ्या का केल्या?” असे प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केले. त्याचप्रमाणे, “काही त्या टीव्हीवाल्यांनी विचारलं कशाला आलात? त्यावर कशाला आलोय कुणाला माहिती. चहा नाही, पाणी नाही, जेवण नाही, काहीच नाही असं ते लोक सांगत होते,” असंही अजित पवार यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> “उद्या तो नगरसेवक झाला तर त्याच्या…”; शिंदेंच्या दीड वर्षाच्या नातवावरुन टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा टोला

या मेळाव्यासाठी राज्यातील वेगवगेळ्या भागांमधून लोकांना आणण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र यामुळे ग्रामीण भागात बसचा तुटवडा जाणवला असंही अजित पवार म्हणाले. “१० कोटी रुपये तुम्ही एसटीला भरता. कुठून आले १० कोटी रुपये? तुम्ही गावच्या एसटी तिकडे आणल्यात. एसटी रद्द कराव्या लागल्या ग्रामीण भागात. त्यांना एसटी मिळाल्या नाहीत त्या दिवशी. यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का?” असा प्रश्न अझित पवारांनी विचारला.

नक्की वाचा >> BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…”

मुख्यमंत्री शिंदेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणामध्ये महाराष्ट्राच्या वाटचालीसंदर्भातील मुद्दे आवश्यक होते असंही अजित पवार यांनी म्हटलं. “वाचूनच भाषण सुरु होतं. असं नाही चालत. शिंदेसाहेब हा महाराष्ट्र आहे. देशातील एक प्रगत राज्य आहे. असं असताना तुम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्या कोणत्या दिशेने नेणार आहात ते सांगायला हवं होतं,” असं मत विरोधी पक्ष नेत्यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> “आई-वडिलांना शिव्या द्या चालेल पण मोदी, शाहांना शिव्या देणं सहन करु शकत नाही”; जाहीर भाषणात चंद्रकांत पाटलांचं विधान

शिंदेंचं भाषण इतका वेळ चाललं की लोक उठून निघून गेले असा टोला अजित पवार यांनी लगावला. “कालचं तर भाषण काय चाललं होतं. दीड तास भाषण केलं. एक तास २४ मिनिटं भाषण झालं. शेवटी लोक उठून जायला लागल्यामुळे थांबावं लागलं. नाहीतर किती तास केलं असतं कुणाला माहिती. कारण पहिल्यांदात इतकी लोक दिसली म्हणून बळच भाषण. मला टीका करायची नाही पण वस्तूस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाला समोरुन प्रतिसाद मिळत नव्हता. पण उद्धव ठाकरेंच्या भाषणाला प्रतिसाद मिळत होता,” असं अजित पवार म्हणाले.

नक्की वाचा >> Dasara Melava: “…तेव्हा राज ठाकरेंना शिव्या घालण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले”; शिंदे गटातील खासदाराचा खळबळजनक आरोप

याच भाषणामध्ये अजित पवार यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये निधीच्या बाबतीत भेदभाव होता कामा नये अशी अपेक्षा व्यक्त केली. “सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला ५० कोटीची कामं दिली तर विरोधी पक्षाच्या आमदाराला २५ कोटीची तरी कामं दिली पाहिजेत. या असल्या गोष्टी कोणी करायला लागलं तर कुणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही हे लक्षात ठेवावं,” असं अजित पवार म्हणाले. पुढे अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या मपदावर कायमचे बसायला आलेले नाहीत असंही म्हटलं. “एकनाथ शिंदे पण कायमचे तिथे बसायला नाही आले. उद्या १४५ चा आकडा बाजूला गेला तर याही बाबाला घरी जावं लागेल. कुठेतरी अंतर्गमुख होऊन त्यांनी विचार केला पाहिजे,” अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar slams eknath shinde over dasara melava speech says if majority is not there this cm have to resign scsg