कोल्हापूर : महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली करोना संसर्ग नियंत्रणापासून सर्व क्षेत्रांमध्ये उत्तम काम करत होते. तथापि एकनाथ शिंदे यांच्या मनात काहीतरी आले आणि राज्यात सत्ताबदल घडून आला, असे मत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केले. कागल येथील डी. आर. माने महाविद्यालयात खासदार वंदना चव्हाण यांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार हसन मुश्रीफ, भैय्या माने, नवीद मुश्रीफ उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुश्रीफ यांच्या पाठीशी

 हसन मुश्रीफ हे कोल्हापूर जिल्ह्याचे श्रावण बाळ आहेत. संकटावर ते मात करतील. जिल्ह्यातील जनता आणि आम्ही सर्वजण मुश्रीफ यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे सांगत जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी ईडीच्या चौकशी ससेमिऱ्यात अडकलेले हसन मुश्रीफ  यांना पाठबळ दिले.

 शिंदे – फडणवीस सरकारवर टीकास्त्र

दरम्यान केनवडे येथे भविष्यवेधी वर्गशाळेच्या (फ्युचिरीस्टिक क्लासरूम) लोकार्पण सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी राज्यातील सरकारवर टीका केली. ते म्हणाले, निवडणुका संपल्यावर आम्ही सर्व जाती, धर्माला एकत्रित करून शिवाजी महाराजांच्या आदर्शांप्रमाणे वाटचाल करण्याची मुभा देतो. सत्तेवर आलेले शिंदे -फडणवीस सरकार समाजातील जातीय सलोख्याला धक्का निर्माण होईल अशी भूमिका घेत आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला हे न परवडणारे असल्याने आपण जागृत राहून एकमेकांना साथ देऊया.