कोल्हापूर: बऱ्या आणि चुकीच्या अशा दोन्ही घटनांमुळे सतत चर्चेत असणारे कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची अखेर बुधवारी बदली झाली आहे अमोल येडगे हे कोल्हापूरचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत.
अमोल येडगे हे २०१४ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. तसेच आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले आहे.
जिल्हाधिकारी रेखावार यांनी पदभार स्वीकारल्यापासूनच वादग्रस्त कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.करोना संसर्ग काळात आंदोलकर्त्यां भाजपच्या पदाधिकार् यांना तिष्ठत ठेवल्याने त्यांनी रेखावर यांच्या बदलीची मागणी केली होती. पत्रकारांशी त्यांचे अनेकदा बिनसले होते.
हेही वाचा >>>कोल्हापुरातील लक्षतीर्थ मदरसावर अतिक्रमण पथकाची कारवाई; मुस्लिम समाजाच्या विरोधामुळे तणाव
मुख्यमंत्र्यांवर आफत
यामुळे एकदा तर पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयामुळे आंदोलन केले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकारी कार्यालय सोडून बाहेर पत्रकारांशी संवाद साधने भाग पडले होते. या ना त्या कारणामुळे त्यांनी सतेज पाटील, दीपक केसरकर, हसन मुश्रीफ या पालकमंत्र्यांकडे दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले जाते
कौतुकाचे धनी
दरम्यान अलीकडेच राहुल रेखावार यांनी अमेरिकन बंगलो हा ५७ एकराचा भूखंड प्रकरणी दिलेला निकाल हा कौतुकाचा विषय ठरला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या या मध्यवर्ती ठिकाणच्या भूखंडावर बड्या राजकीय नेत्यांचा डोळा होता. त्यावरून मोठा राजकीय दबावही होता. तरीही त्यांनी कशाची फिकीर न करता भूखंड शासन जमा करण्याचा दिलेला निर्णय ऐतिहासिक तितकाच महत्त्वाचा ठरल्याने त्यांचे कौतुक झाले होते.