कोल्हापूर : इचलकरंजी येथील संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का कायदा) अटकेत असलेल्या कुख्यात टोळीतील दोघा आरोपींनी पोलीस कोठडीत विषारी औषध प्राशन केले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.जर्मनी गॅंग मधील या दोघांना इचलकरंजीतील आयजीएम रुग्णालयात आणि नंतर सांगलीतील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे.इचलकरंजी येथील व्यावसायिक सरदार मुजावर यांचे अपहरण झाले होते. या प्रकरणात शहापूर पोलिसांनी जर्मन गॅंगचा म्होरक्या आनंद्या जर्मन व अक्षय कोंडुगळे यांना पकडले होते. त्यांना पोलीस कोठडी ठेवण्यात आले आहे. आज त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपणार होती. दरम्यान पोलीस कोठडीत दोघांनी दुपारी विष प्राशन केले. यामुळे पोलीस प्रशासनासह इचलकरंजी मध्ये एकच खळबळ माजली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विषारी औषधाचा शोध सुरू

त्यांनी विषारी तणनाशक प्राशन केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्यांच्याकडे हे औषध कुठून आले? पोलीस कोठडीत त्यांच्याकडे हे साहित्य कसे गेले? या प्रश्नांचा शोध घेतला जात आहे.तर या दोघांनी नेमके कोणते कोणते विषारी औषध घेतले आहे, याची अधिकृत माहिती रुग्णालयातील अहवाल आल्यानंतर दिला जाईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>साखर कारखान्यांनी प्रतिटन ४०० रुपये देण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

रुग्णालयात एकच गर्दी

इचलकरंजी येथील आयजीएम येथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सांगली येथील येथे दाखल करण्यात आले आहे. आयजीएम येथे आनंद्या जर्मनीचे कुटुंबीय व जर्मन गॅंगचे समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ananda germany a member of the german gang under mokka was poisoned in police custody in ichalkaranji amy