* चित्रनगरी अद्ययावत करण्याचे ज्येष्ठ कलाकारांचे आवाहन
* आवक वाढल्याचा शेतकऱ्यांना फटका
कलानगरी करवीर नगरीत चित्रनगरी खेचून आणण्याचे काम चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अनंत माने यांनी त्यांच्या काळात केले. स्थानिक चित्रपट कामगार, तंत्रज्ञांच्या हाताला काम मिळवून देणाऱ्या चित्रनगरीची सध्याची अवस्था दयनीय आहे. अद्ययावत चित्रनगरी हीच अनंत माने यांना खरे अभिवादन ठरेल, अशा भावना मंगळवारी ज्येष्ठ दिग्दर्शक, संकलक अनंत माने जन्मशताद्बी निमित्त अभिवादन करताना व्यक्त केल्या गेल्या. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने मंगळवारपासून अनंत माने चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शाहू स्मारक भवन येथे ज्येष्ठ तंत्रज्ञ कोयाजी यमकर, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते अनंत माने चित्रपट महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी अनंत माने यांच्या कन्या वैजयंती भोसले आणि चिरंजीव चंद्रकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
चित्रपट सृष्टीतील अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींनी पुढच्या अनेक कलाकार पिढीसाठी चित्रपटाचा हा पाया घालून दिला आहे. हा पाया कायम राखणे हेच आता आपल्या हातात आहे, असे मत चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक महामंडळाचे प्रमुख कार्यवाह सुभाष भुर्के यांनी केले.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
अनंत माने यांच्यामुळेच चित्रपट महामंडळ आणि चित्रनगरीसारखी फळे कोल्हापूरला चाखायला मिळाली. त्यांच्या कार्यकालात त्यांनी जमेल तितके या मातीसाठी केले. चित्रनगरी हे त्यांचे स्वप्न आज मुíच्छतावस्थेत आहे. लोकप्रतिनिधींचे याकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याची खंत चंद्रकांत जोशी यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा