अनंत माने यांची चित्रपट कारकीर्द मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जावी इतके त्यांचे योगदान मोठे होते. त्यांनी कोल्हापूर चित्रनगरीच्या उभारणीतही अपार कष्ट घेतले असल्याने स्वतंत्ररीत्या चित्रनगरीचा विकास ही त्यांना खरी आदरांजली असणार आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
मिरजकर तिकटी येथील कलायोगी जी. कांबळे आर्ट गॅलरीच्या सभागृहात अनंत माने यांच्या जन्मशताब्दीचा सांगता समारंभ झाला. या वेळी ते बोलत होते.
कुलकर्णी म्हणाले, अनंत माने यांनी चित्रनगरीच्या भूमिपूजनप्रसंगी आज माझ्या जीवनाचे सार्थक झाले, असे उद्गार काढले होते. त्या वेळी गोरेगाव चित्रनगरीचा एक भाग म्हणून कोल्हापूर चित्रनगरीचा प्रस्ताव होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. आता पुन्हा हा विषय काढण्यात आला आहे. मात्र, कोल्हापूर चित्रनगरीचा स्वतंत्रपणे सर्वागीण विकास व्हायला हवा.
या वेळी विकास मोरबाळे, केशव पंदारे, सुरेंद्र पन्हाळकर, मंगेश मंगेशकर, अर्जुन नलवडे, किसन बोंगाळे, अशोक माने, मधुकर वाघे, अशोक जी. कांबळे, बबन कांबळे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा