राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर त्याची संतप्त प्रतिक्रिया कोल्हापुरात उमटली. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्यपालांनी माफी मागण्याची तर संभाजी राजे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे. शिवसेनेने कोल्हापुरी चप्पल दाखवीत राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली.
राज्यपालांना घरी पाठावयाचं की तुरुंगात याचा विचार करण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे
तसेच, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी “ राज्यपाल हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद आहे. मात्र राज्यपाल कोश्यारी हे वारंवार महाराष्ट्रातील थोर समाज सुधारक क्रांतिकारक तसेच सर्वसामान्य मराठी माणसाचा वारंवार करत आहेत. देशाची आर्थिक राजधानी मुंबई संदर्भात बेताल वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांनी तत्काळ जाहीर माफी मागावी.” अशी मागणी केली आहे.
राज्यपाल कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले…
याचबरोबर छत्रपती संभाजी राजे यांनी भगतसिंग कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याकडे केली आहे. “राज्यपालांची जीभ वारंवार घसरते. शिवराय, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी पातळी सोडून त्यांनी विधान केले आहे. ते महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यांची बदली करून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे भान असणारी सुयोग्य व्यक्ती राज्यपालपदी नियुक्त करावी.”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शिवसेनेचे आंदोलन –
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना कोल्हापुरी जोडा दाखवावे, असे विधान केल्यानंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी मोठ्या आकाराची कोल्हापुरी चप्पल उभा करून राज्यपालांच्या विरोधात आंदोलन केले. मिरजकर तिकटी येथे त्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.