कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी व सांगली जिल्ह्यातील आष्टा या दोन ठिकाणी एमआयडीसी सुरु करण्याला मंगळवारी उद्योग विभागाने तत्वता मान्यता दिली आहे. तसेच, मजले येथे नियोजित ड्राय पोर्टसाठी लागणारी जमीन एमआयडीसी मार्फत महामार्ग प्राधिकरणला हस्तातरीत करण्याचा निर्णायही घेण्यात आला आहे. याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे,अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

 मुंबई येथे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीमध्ये खासदार माने यांच्या मागणी नुसार आयोजित बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, एमआयडीसीचे बिपिन शर्मा, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार, सांगली जिल्हाधिकारी डॉ राजा दयानीधि, भाऊसाहेब आवळे उपस्थित होते.

tripurari
लक्ष्य दिव्यांनी उजळले दगडूशेठ गणपती मंदिर! लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी, पाहा सुंदर Video
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
bsc nursing admission 1600 posts
राज्यात बीएस्सी नर्सिंगच्या १६०० जागा रिक्त, संस्थात्मक प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
Govt Issues New Rules To Stop Misleading Ads By Coaching classes
विश्लेषण : शिकवणी वर्गांच्या जाहिरातींना चाप?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
Nurses without pay for four months Mumbai print news
परिचारिका चार महिने वेतनाविना
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

वंचित भागात उद्योग

 शाहूवाडी हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. येथील तरुणांन  आपल्याच तालुक्यात रोजगार मिळावा यासाठी तेथे एमआयडीसी स्थापन व्हावी यासाठी प्रयत्न खासदार माने प्रयत्न करत होते . आज त्याच्या मागणीला यश आहे. तसेच, आष्टा येथे एमआयडीसी होण्याच्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या जुन्या मागणीला प्रतिसाद मिळाला आहे. उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांसह कोल्हापूर व सांगलीच्या जिल्हाधिकारी यासाठी जागेची पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.