उपाध्यक्षपदी सुनीता रेडेकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अशोक चराटी यांची, तर उपाध्यक्षपदी सुनीता रेडेकर यांची निवड करण्यात आली. दोघेही भाजपप्रणीत महाआघाडीचे संचालक आहेत. चराटी यांची अध्यक्षपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत प्रचंड आतषबाजीत उघडय़ा जीपमधून मिरवणूक काढली. यामध्ये उपाध्यक्षा रेडेकर व त्यांचे कार्यकत्रेही मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
नूतन पदाधिकारी निवडीच्या पाश्र्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती कीर्ती नलवडे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बठक पार पडली.
अध्यक्षपदासाठी महाआघाडीकडून चराटी यांची, तर राष्ट्रवादीकडून रेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन अर्ज दाखल झाल्याने रेडेकर यांनी गुप्त पद्धतीने मतदानाची मागणी केली. महाआघाडीने हात उंचावून मतदान घेण्याची मागणी केली.
अखेर हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदानात राष्ट्रीय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अंजना रेडेकर यांचा अशोक चराटी यांनी, तर उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मधुकर देसाई यांचा सुनीता रेडेकर यांनी ११ विरुद्ध १० मतांनी पराभव केला.
सुमारे दीड तास निवड प्रक्रिया सुरू होती. यावेळी नूतन उपाध्यक्षा सुनीता रेडेकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई यांचीही भाषणे झाले. माजी आमदार महादेवराव महाडिक, तहसीलदार शिल्पा ठोकडे, कार्यकारी संचालक पी. एल. हरेर, आघाडीप्रमुख रवींद्र आपटे, विष्णुपंत केसरकर, राजेंद्र गड्यान्नावर आदी यावेळी उपस्थित होते.
डिस्टिलरी प्रकल्प सुरू करणे, विस्तारीकरण करणे, शेतकरी व कामगारांचे प्रश्न सोडविणे यालाच आपले प्राधान्य राहील, असे नूतन अध्यक्ष चराटी यांनी सांगितले.
आजरा साखर कारखान्याशी अशोक चराटींचा काय संबंध? असा प्रश्न काही मंडळी विचारत होती. केवळ निवडून देऊनच नव्हे, तर आपणाला अध्यक्षपदी बसवून सभासदांनीच त्यांना सणसणीत चपराक दिली आहे, अशी प्रतिक्रिया चराटी यांनी दिली.