गुन्ह्याचा तपास न करण्यासाठी ९ हजार रुपयाची लाज स्वीकारल्या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रंगेहात पकडला गेला. दिलीप योसेफ तिवडे (वय ५५, रा. कदमवाडी कोल्हापूर ) असे त्याचे नाव आहे. यातील तक्रारदारांचे पाळीव कुत्रे चावल्याने भांडण झाले होते. या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यास तक्रारदार व त्यांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा >>> पन्हाळागडावर शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणार, हसन मुश्रीफ यांची घोषणा; कागलमध्ये भव्य मिरवणूक
याचा तपास तीवडे याच्याकडे होता. त्याने बाप लेकांना अटक व गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपयाची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यावर दहा हजार रुपये एवजी नऊ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाचेची रक्कम देत असताना आज दिलीप तीवडे यास रंगेहात पकडले असून त्याच्यावर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.