कोल्हापूर : विकलेली मोटार ओमनी व्हॅन परत मिळवून देण्यासाठी १० हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुवारी रंगेहात पकडला गेला. सोमनाथ देवराम चळचुक (वय ४८, मूळ रा. बाडगी जिल्हा नाशिक) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
तक्रारदार यांनी महिंद्रा फायनान्स कडून ओमनी व्हॅन विकत घेतली होती. ती उमळवाड येथील मित्राला विकली होती. तो वित्तीय संस्थेचे हप्ते भरत नव्हता. शिवाय त्याने ती गाडी परस्पर विकली होती. त्यामुळे तक्रारदाराने मोटार परत मिळवण्यासाठी चळचुक याच्याशी संपर्क साधला साधला असता १५ हजार रुपये लाचे ची मागणी केली. तोडजोड अंती १० हजार रुपये देण्याचे ठरले. ही रक्कम आज देत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून चळचूक याला रंगेहात पकडले.
First published on: 20-04-2023 at 18:11 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Assistant police inspector jailed for accepting bribes kolhapur amy