कोल्हापूर : कोल्हापूरचा थोरला दवाखाना म्हणून ओळखला जाणाऱ्या सीपीआर रुग्णालयात भटक्या कुत्र्यांनी मृत अर्भकाचे लचके तोडण्याचा प्रकार गुरुवारी घडला. यामुळे या शासकीय रुग्णालयातील बेपर्वाईचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले.
छत्रपती प्रमिला राजे शासकीय रुग्णालयातील ल प्रसुती विभागामध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय असते. आज रुग्णालयाच्या शवविच्छेदन कक्षा शेजारी असलेल्या पत्र्याच्या शेड जवळील रिकाम्या जागेत भटकी कुत्र्यांकडून मृत अर्भकाचे लचके तोडले जात असल्याचा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आला. याची माहिती रुग्णालय कर्मचारी व पोलिसांना देण्यात आली. लक्ष्मीपुरी पोलिसांनी मृत अर्भकाचे शव ताब्यात घेतले. मात्र हे अर्भक नेमके कुठून आले याची चौकशी केली जात आहे.