‘वचन पाळा- एड्स टाळा’, ‘सुरक्षित लैंगिक जीवन- एड्सपासून संरक्षण’, ‘सर्वासाठी एकच नारा-एचआयव्ही चाचणी करा’, ‘गाठूया गाठूया- शून्य गाठूया’ अशा विविध घोषणांनी एड्स प्रतिबंधक जनजागृती रॅलीने मंगळवारी शहर दुमदुमले.
जागतिक एड्सदिनानिमित्त छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणातून जिल्हा एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण पथकाच्या वतीने काढण्यात आलेल्या एड्स जनजागृती रॅलीचा प्रारंभ महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी हिरवा झेंडा दाखवून केला.
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रांगणातून प्रांरभ झालेली ही एड्स जनजागृती रॅली पुढे टाऊल हॉल, दसरा चौक, लक्ष्मीपुरी, महानगरपालिका माग्रे पुन्हा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात आली. या रॅलीमध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नस्रेस, एनसीसी छात्र तसेच शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.
एड्स नियंत्रण कार्यक्रमाची व्यापक जनजागृती करण्यावर जिल्हा एड्स प्रतिबंधक आणि नियंत्रण पथकाने भर दिला असून, शून्य गाठायचे आहे या उद्दिष्टाने संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणि स्वयंसेवी सेवाभावी संस्थांनी एड्स नियंत्रण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिप्पुरकर यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. या वेळी शिप्पुरकर यांनी एड्सदिनानिमित्त सर्वाना शपथ दिली. याप्रसंगी एड्स नियंत्रणात उत्कृष्ट कार्य करणा-या अधिकारी कर्मचा-यांसह सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कार आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते करण्यात आला.
आरोग्य उपसंचालक डॉ. आर. बी. मुगडे, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एस. साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. सी. आडकेकर, डॉ. विजया शहा, जिल्हा हिवताप अधिकारी हर्षला वेदक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा