कोल्हापूर : शहरातील रस्त्यांची वाताहत झाली असताना, नव्याने होणाऱ्या रस्त्यांचे सुख वाहनधारकांना धडपणे अनुभवता येत नसल्याची स्थिती आहे. कोल्हापूरची व्यापारी पेठ असा लौकिक असलेल्या शाहूपुरीतील रस्ता पंधरा वर्षांनंतर नव्याने करण्यात आला असताना, दुसऱ्याच दिवशी त्याची खोदाई केल्याने स्थानिकांनी महापालिकेच्या कारभारावर टीकास्त्र सोडले.

शाहूपुरी ही शहराची प्रमुख व्यापारी पेठ आहे. पेठेतील रस्ते गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करण्यासाठी स्थानिकांनी महापालिकेकडे सातत्याने मागणी केली होती. दीर्घ काळानंतर या भागात रस्त्याचे काम केले जात आहे. शाहूपुरी पहिल्या गल्लीत रस्त्याचे काम काल झाले, तर आज लगेच तेथे खोदाई करण्यात आली.

pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
pimpri chinchwad construction timing
पिंपरी : बिल्डरांना ‘या’ वेळेत बांधकाम करता येणार नाही; महापालिकेकडून नियमावली जारी
leopard Amravati, leopard died Amravati, Amravati,
अमरावती : वाहनाच्या धडकेत पुन्‍हा एका बिबट्याचा बळी
Shaktipeeth Highway, Agitation Sangli-Kolhapur route,
शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी सांगली-कोल्हापूर मार्गावर आंदोलन
PMP bus pune, PMP bus accident risk,
पुणेकर सावधान! रस्त्यांवरून धावताय मृत्यूचे सापळे, प्रवाशांचा जीव धोक्यात?
ulhasnagar Abandoned vehicles removed from main roads
मुख्य रस्त्यांवरील बेवारस वाहने हटवली, उल्हासनगर महापालिकेची वाहतूक पोलिसांसह संयुक्त कारवाई
Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation ,
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?

हेही वाचा >>>कोल्हापुरातील सहकार, शिक्षणाचे डॉ. मनमोहन सिंग यांना आकर्षण

कारभार सुधारणार कधी?

त्यावरून नागरिकांनी कंत्राटदारास विचारणा केली. तांत्रिक दोष असल्याने हे काम रस्ता बनविल्यानंतर करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. हे स्पष्टीकरण पटले नाही. मुळातच १५ वर्षांनंतर या भागात नव्याने रस्ता होत आहे. तांत्रिक कामे रस्ते होण्यापूर्वीच का केली नाहीत. एकीकडे शहरात रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे फलक लावले जात आहेत. दुसरीकडे रस्त्यांची दुरवस्था कायम आहे. कोल्हापूर महापालिकेचा हा भोंगळ कारभार सुधारणार कधी, असे म्हणत नागरिकांनी या कामाच्या ठिकाणी संताप व्यक्त केला.

Story img Loader