लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर: जैन समाजाचे सीमाभागातील संत प.पू.आचार्य श्री १०८ कामकुमारनंदीजी महाराज यांची निर्घृण हत्येच्या निषेधार्थ संपूर्ण भारत देशात गुरूवारी (२० जुलै) जैन समाजाने बंद घोषित केला आहे. कामकुमारनंदीजी महाराज यांची हत्या हिरेकूडी (ता.चिकोडी कर्नाटक) येथे झाली.

जैन धर्माचे साधू संत यांची हत्या होण्याचे प्रमाण वाढत आहे. काही साधू संतांचा विहार करीत असताना वाहने अंगावर घालून हत्या करण्यात आली. जैन समाजाच्या साधू संतांना संरक्षण देणेत यावे, अशी मागणी जैन समाजाची आहे.

आणखी वाचा-गमछा, हिजाब वरून कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयात वाद

या घटनेकडे व मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी २० जुलै रोजी भारत बंद घोषित केला आहे. आपले व्यवहार बंद ठेवून आंदोलन यशस्वी करावे, असे निवेदन भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ व सकल जैन समाज इचलकरंजी यांचेतर्फे करण्यात आले आहे.