कोल्हापूर : कोल्हापुरात उसदराची कोंडी बुधवारी फोडली ती एका गुऱ्हाळघराने. मजले. (ता. हातकंणगले) येथील भुधन फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. या गुहाळघराने  ऊसाची पहिली उचल प्रतिटन ३१५० रूपये देण्याचे जाहीर करतानाच मागील हंगामातील उसाला १०० रुपये अधिक देण्याची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ऊस प्रश्नावर तोडगा निघणार? बुधवारी मंत्रालयात बैठक, राजू शेट्टी यांना निमंत्रण

भुधन फार्मर प्रोड्युसर कंपनी या नावाने मजले येथील तरूण शेतकरी एकत्रित येवून गु-हाळघर सुरू केले आहे. याठिकाणी गुळ पावडर व गुळाचे उत्पादन घेतले जाते. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला या कंपनीने तालुक्यातील इतर कारखान्याप्रमाणे २९०० रूपये प्रतिटन दर दिला आहे. या कंपनीकडून गुळापासून कोणतेही उपपदार्थ तयार होत नसतानाही २९०० रूपये व संघटनेच्या मागणीप्रमाणे १०० रूपये दर जाहीर केला आहे. तसेच यावर्षी गाळपास येणा-या ऊसास प्रतिटन ३१५० रूपये दर जाहीर केला आहे.

कारखान्यांनी आत्मपरीक्षण करावे

याबाबत राजू शेट्टी म्हणाले, गु-हाळघरांचा उतारा १० टक्यापर्यंत असतो. त्यातून गुळ पावडर उत्पादन करून इतका दर देता येतो. तर मग साखर कारखान्यांना हा आरसा असून त्यांनी काबाड कष्ट करणा-या ऊस उत्पादक शेतक-यांच्या ताटात काय कालवले आहे याचे आत्मपरीक्षण केले पाहिजे.