विधानसभा निवडणूक जिंकली…पण ज्यांच्या बळावर यश प्राप्त केले त्या जनतेप्रति सामाजिक बांधिलकी व जनहित सार्थकी लावण्यासाठी इचलकरंजीचे भाजप आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी मताधिक्याइतके ५६ हजार ८११ वृक्ष लागवड मतदारसंघ व परिसरात करण्याचा संकल्प बुधवारी केला.

हेही वाचा >>> कोल्हापूर : विधानसभेचा निकाल मनसेला अमान्य; अविनाश जाधव

Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi Critized Mohan Bhagwat
Rahul Gandhi : राहुल गांधींनी लोकसभेत मोहन भागवतांचं नाव घेताच गदारोळ; म्हणाले, “आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं स्वप्न…”
What Rahul Gandhi Said?
Rahul Gandhi : राहुल गांधींचं वक्तव्य, “मेक इन इंडिया चांगली योजना, पंतप्रधानांनी प्रयत्नही केले पण…”
Former corporator protest , Chandrapur ,
चंद्रपूर : माजी नगरसेवकाचा खड्ड्यात बसून सत्याग्रह
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
पांढरे डाग असणाऱ्यांसाठी वधुवर परिचय मेळावा नागपुरात
Nanded District , Government Agricultural College,
अशोक चव्हाणांच्या पक्षांतरामुळेच कृषी महाविद्यालयाला शंकरराव चव्हाणांचे नाव

माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांचे नातू आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र असलेले आमदार राहुल आवाडे यांनी आपल्या आजोबांच्या पर्यावरणाचे जतन संकल्पनेला बळ देण्याचा छोटासा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात केलेली वृक्षलागवड लौकिकास पात्र ठरली आहे. त्याच धर्तीवर निवडणुकीत मताधिक्याइतकी वृक्षलागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. हा संकल्प वस्त्रनगरी, औद्योगिकनगरी असलेल्या इचलकरंजीला वायुप्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. विविध कारणांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना निसर्गाला समृद्ध करण्यासाठी वृक्ष लागवडीशिवाय पर्यायच नाही. त्यामुळे ५६ हजार ८११ वृक्ष लागवडीच्या संकल्पनेतून पर्यावरणाला बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांनीही या संकल्पनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले आहे.

Story img Loader