कोल्हापूर महापालिकेत भाजप, ताराराणी आघाडीने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. कोल्हापूर महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला होता. निकालांनंतर महापौरपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तरीही चंद्रकांत पाटील महापौरपदासाठी प्रयत्नशील होते. अखेर शुक्रवारी त्यांनी आपण विरोधात बसणार असल्याचे सांगितले.
कोल्हापूरमध्ये भाजप, ताराराणी आघाडी आणि शिवसेना हे सर्व पक्ष प्रभावी विरोधक म्हणून काम करतील. शहराच्या विकासासाठी भाजपकडे सत्ता देण्याचे आवाहन आम्ही केले होते. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आम्हाला सत्ता स्थापन करणे शक्य नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
येत्या १६ नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये महापौरांची निवड होणार आहे. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नव्या महापौरांची निवड होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा