मतमोजणीतील साशंकतेमुळे चच्रेत राहिलेल्या आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणीत महाआघाडीने आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पराभूत करून सत्ता प्राप्त केली. महाआघाडीला १० विरुद्ध ११ अशा एकच मताधिक्याने यश मिळाले. माजी अध्यक्ष जयवंतराव िशपी अवघ्या १२ मतांनी पराभूत झाले तर त्यातून फेरमतमोजणीमुळे निकालाला कलाटणी मिळाली.
काल सायंकाळी सर्व निकाल लागले. यामध्ये महाआघाडीला ११ तर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला १० जागा मिळाल्या. यामध्ये विद्यमान अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांचा ४८ मतांनी पराभव झाल्यामुळे त्यांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज केला. तसेच हत्तिवडे-मलिग्रे गटात महाआघाडीचे भीमा दळवी यांचा १४ मतांनी पराभव झाल्यामुळे त्यांनीही फेरमोजणी मागितली. आजरा शृंगारवाडी व हत्तिवडे मलिग्रे उत्पादक गटाच्या फेरमतमोजणीत सत्ता काँग्रेस आघाडीकडे आली.
पहिल्या निकालात पराभव झालेले जयवंतराव शिंपी फेरमतमोजणीनंतर विजयी झाले व राष्ट्रवादी-काँग्रेसच्या जागा ११ व महाआघाडीच्या जागा १० झाल्या. निकालात फरक आढळल्याने महाआघाडीने पुन्हा फेरमतमोजणीची मागणी केली. रात्री उशिरा दुबार फेर मतमोजणीवेळी नाटय़मय कलाटणी मिळाली अन् महाआघाडीला सत्ता मिळाली.
फेर निकाल बाहेर पडल्यानंतर कार्यकत्रे संतप्त झाले. कार्यकत्रे ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने व मतमोजणीस्थळी घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहून त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला. यानंतर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. गडिहग्लज, नेसरी येथील पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला.
विजयानंतर रवींद्र आपटे म्हणाले, आजरा तालुक्यातील मंडळी सहकार क्षेत्रातील उत्तमप्रकारे काम करू शकतात हे यापूर्वीच सिद्ध करून दाखविले आहे. जिल्ह्यातील नेत्यांनी तालुक्याच्या सहकारी संस्थांमध्ये चालविलेला हस्तक्षेप सभासदांनी रोखला आहे.
कारखाना आदर्श पद्धतीने चालविला जाईल. तर विद्यमान अध्यक्ष अल्बर्ट डिसोझा यांनी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला अतिशय चांगले वातावरण असताना नेतेमंडळीमधील समन्वयाचा अभाव पराभव कारणीभूत ठरला. मतदारांनी आपणास दिलेला कौल मान्य असून सत्तेत आलेल्या मंडळींनी कारखाना चांगल्यापद्धतीने चालवावा, असे म्हटले आहे.

Story img Loader