कोल्हापूर : प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांच्या पाठोपाठ त्यांच्यावर नितांत प्रेम करणारा लाडका ब्रुनो या कुत्र्याने हे जग सोडले. उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिवंगत आमदार पाटील यांचे कुटुंबीय आणि ब्रुनो यांचे प्रेमाचे नाते होते. त्यांच्या सुनबाई तेजस्विनी पाटील यांनी गोल्डन रिट्रिव्हर जातीचा कुत्रा माहेराहून आणला होता. नऊ वर्षाचा हा कुत्रा पाटील कुटुंबातील सर्वांच्या गळ्यातील ताईत होता. पी. एन. पाटील यांचा त्याच्यावर खूप जीव होता. ते जिथे असेल तेथे तो पाठीमागे फिरत असे. क्वचित कधी ते रागावले तर तो चुपचाप बाहेर जाऊन बसत असे. कुटुंबातील अन्य कोणी बोलावले तरी तो ढिम्म हलत नसे. पण एन पाटील यांनी हाक मारली की तो पटकन उठून त्यांच्याजवळ येत असे.

हेही वाचा – अन्यथा मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार – राजू शेट्टी

हेही वाचा – भरघाव वेगाने मोटार चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या इचलकरंजीतील युवकावर गुन्हा दाखल

आमदार पी एन पाटील यांचा घरी अपघात झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून ब्रूनोची अन्नपाण्यावरील वसं उडाली. त्याने अन्नाचा त्याग केला. धनी परतण्याची तो डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होता. पोटात अन्नाचा कण नसल्याने त्याची प्रकृती खालावत गेली. सलाईन लावून उपचार केले जात होते. सारे उपचार आज ठाकले. ब्रूनोने आज प्राण सोडला. त्याच्या स्वामीनिष्ठेच्या अनेक कथा त्याच्याबरोबर काळाच्या पडद्याआड गेल्या असून उरल्या आहेत त्या त्याच्या उबदार आठवणी.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bruno dog passes away followed by mla pn patil ssb