कोल्हापूर : उचगाव (तालुका करवीर) येथे एका तरुणाचा खून झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. गणेश नामदेव संकपाळ (वय ४०, रा. गणेश कॉलनी उचगाव) असे या तरुणाचे नाव आहे. तो एका फर्निचर दुकानात काम करीत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – कोल्हापूर : शिरोळ मधील खून प्रकरणातील संशयित २४ तासात अटक

गणेश हा काल रात्री डॉक्टरांकडे गेला होता. तो घरी परत आला नसल्याने शोधाशोध केली होती. आज सकाळी फिरायला गेलेल्या काही लोकांना कृषी महाविद्यालयाच्या आवारात एक मृतदेह आढळला. त्याची माहिती लोकांनी पोलिसांना दिली. गांधी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हातावरील खुणावरून मृताची ओळख पटली. गणेश संकपाळ असे त्याचे नाव असल्याचे निष्पन्न झाल. त्याच्या डोक्यावर सिमेंटची पाईप घातली होती. पोट व पाठीवर धारदार शस्त्रान वार केले आहेत. गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.