काळाच्या गत्रेत नामशेष होऊ पाहणारी बौद्धकालीन लेणी वाचवून प्राचीन कोल्हापूरचा बौद्ध संस्कृतीचा वारसा जपण्याचा प्रयत्न गेली २५ वष्रे येथे सुरू आहे. पन्हाळ्यालगत असलेल्या मसाई पठार, पांडवदरा व पोहाळे येथील ऐतिहासिक लेणी आणि त्यांचे सौंदर्याचे जतन व्हावे यासाठी साठी ओलांडलेल्या या तरुणांचे एक पथक अथकपणे राबत आहे. वेगवेगळ्या शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आणि लोकप्रतिनिधी, मंत्री यांना या लेणी संवर्धनाचे महत्त्व पटवत त्यांचा पाठपुरावा करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळ्याच्या पश्चिमेस असलेली पांडवदरा, पन्हाळ्याजवळील मसाई पठार, जोतिबाच्या डोंगराजवळ पोहाळे येथे बौद्ध लेणी आहेत. आपल्या सुंदर स्थापत्याने लोकांचे मन जिंकणाऱ्या या लेण्याचे वेळीच जतन करणे गरजेचे आहे.

या जागांनाही संरक्षण देणे गरजेचे आहे. काही वर्षांपूर्वी मसाई पठार, पांडवदरा व पोहाळे येथील लेण्यांमध्ये काही समाजकटंकांनी इथल्या अवशेषांना धक्का लावण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या अनेक लेण्यांमध्ये अन्य काही गैरप्रकारही चालतात. हे सर्व प्रकार रोखण्यासाठी सम्राट अशोककालीन बौद्ध लेणी उत्सव समितीची स्थापना केली असून तिच्या पदाधिकाऱ्यांकडून हे प्रयत्न केले जात आहे. प्राचीन बौद्ध संस्कृतीच्या वारशाचे जतन करण्यासाठी या समितीचे अध्यक्ष टी. एस. कांबळे, कार्याध्यक्ष बापूसाहेब कांबळे, उपाध्यक्ष माजी आमदार नानासाहेब कांबळे, सचिव सर्जेराव थोरात हे वयोवृद्ध सदस्य शासन दरबारी चकरा मारत आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे काही लेण्यांमधील संवर्धनाचे काम सुरू झाले आहे.

पोहाळे येथील बौद्धकालीन लेण्यांची दुरवस्था झाली आहे. कोसळलेले स्तंभ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

निधीसाठी प्रयत्न – जिल्हाधिकारी

कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन आराखड्यात या बौद्धकालीन लेण्यांचा समावेश आहे. त्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याकामी निधी मिळवून कामाला गती देण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Buddhist heritage in kolhapur
Show comments