शहरातील अवैध फलकाविरुद्धच्या थंडावलेल्या मोहिमेला महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा हात घातला असून गुरुवारी या अंतर्गत विनापरवाना १७ डिजिटल बोर्ड व २० छोटे बॅनर काढण्यात आले.
शहरामध्ये मोठय़ा प्रमाणात विनापरवाना विविध जाहिरात फलक उभे करण्यात आलेली आहेत. सदर जाहिरात फलकासाठी महापालिकेकडून रितसर परवानगी घेणे आवश्यक आहे. ज्या फलकधारकांनी परवानगी घेतलेली नाही अशा अवैध जाहिरात फलक, होíडंग्ज, बॅनर्स हटविण्याची कारवाई महापालिकेच्या चारही विभागीय कार्यालयाकडून सुरू करण्यात आली आहे.
याअंतर्गत आज शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत गंगावेश दूध कट्टा, पापाची तिकटी, लोणार चौक, गवळ गल्ली, क्षीरसागर चौक, तोरस्कर चौक, परीट गल्ली, प्रवीण बेकरी, शुक्रवार गेट, वाघाची तालीम, लक्षतीर्थ मेन रोड, त्रिमूर्ती कॉलनी, रंकाळा स्टॅण्ड या रस्त्यावरील विनापरवाना १७ डिजिटल बोर्ड व २० छोटे बॅनर काढण्याची कारवाई करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा