भाजप-ताराराणी आघाडीने महापालिका निवडणुकीसाठी आणखी एक यादी प्रसिध्द केली आहे. भाजपाने पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष नाना जरग यांच्या घरातील उमेदवारी नाकारली आहे. तर, ताराराणी आघाडीने प्रकाश नाईकनवरे व त्यांच्या सुनेला अशा दोन उमेदवारी देऊ केल्या आहेत. गणेशोत्सवात हद्दपारीची नोटीस लागू झालेल्या हेमंत कांदेकर यास भाजपाने उमेदवारी दिली आहे.
भाजपाचे निष्ठावंत कार्यकत्रे नाना जरग यांनी प्रभाग क्रमांक ७८ मध्ये वैशाली जरग या भावाच्या सुनेसाठी उमेदवारी मागितली होती. उमेदवारी निश्चित असल्याचे पक्षाकडून सांगितले जात असताना प्रत्यक्षात गीता श्रीपती गुरव यांचे नाव यादीत दिसल्याने निष्ठावंत कार्यकत्रे नाराज झाले आहेत. मागील सभागृहामध्ये सत्तारुढ गटाकडून नाईक-नवरे हे उभयता सदस्य होते. आता प्रकाश नाईक-नवरे यांनी ताराराणी आघाडीशी जुळवून घेतले आहे. ते स्वत व्हिनस कॉर्नर येथून तर सून पूजा यांनी शाहुपूरी तालीम प्रभागातून उमेदवारी मिळविली आहे. गेल्या वेळी भाजपाने दत्ता बामणे यांची दोन नंबरवाला उमेदवार अशी टीका केली असताना आता त्यांच्या पत्नीला राजलक्ष्मीनगर प्रभागातून उमेदवारी दिली आहे. स्वाभिमानी व रिपब्लिकन पक्षाचा रोष लक्षात घेऊन आणखी एक उमेदवारी त्यांना देऊ केली आहे. सुवर्णा साळोखे या संघटनेच्या उमेदवारात प्रभाग ७७ तर रिपाइंचे अशोक भंडारे यांना राजेंद्रनगर प्रभागातून उमेदवारी दिली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा